8 thoughts on “BUDDHIST CHILD NAMES

 1. बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना यांना एकत्रितपणे
  त्रिरत्न वंदना असे म्हणतात.
  १. बुद्ध वंदना
  इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो,
  विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो, पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।।
  बुद्धं जीवितं परियन्तं सरणं गच्छामि ।
  ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता।
  पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा। ||१||
  नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं।
  एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंङ्गलं ।||२||
  उत्तमग्गेन वंदे हं पादपंसु वरुत्तमं।
  बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं।||३||
  य किन्ची रतनलोके विज्ज्ती विविधं पुथु |
  रतन बुद्धसमं नात्थ्इ, तस्मा सोत्थी भवतुमे ||४||
  यो सन्निसिन्नो वरबोधि मुले, मारं ससेनं महंति विजेत्वा
  सम्बोधिमागच्चि अनंतञान, लोकत्तमो तं प नमामी बुद्ध||४||
  अर्थ
  अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण), सम्बुद्ध (जागृत), विद्या व आचरण यांनी युक्त, सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे. असा लोकांना जाणणारा, सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचा सारथि व आधार देणारे, देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.
  अशा या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे ।।१।।
  मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांनाच मी सदैव वंदन करतो ।।२।।
  मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही, केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ।।३।।
  बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो. बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला क्षमा करो ।।४।।
  ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही. त्या (बुद्ध) रत्नाने माझे कल्याण होवो. (ज्ञान प्राप्त झालेल्या) ज्याने पुज्य
  बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला. अनंत ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्व प्राप्त करुन घेतले. जो सर्व जगात श्रेष्ठ आहे. अशा बुद्धाला मी नमस्कार करतो ।।५।।
  २. धम्म वंदना
  स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको,
  एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।
  धम्मं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
  ये च धम्मा अतीता च, ये च धम्मा अनागता।
  पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा।
  नत्थि मे सरणं अञ्ञं धम्मो मे सरणं वरं।
  एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं।
  उत्तमङ्गेन वन्देहं, धम्मञ्च दुविधं वरं।
  धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं।
  अर्थ
  भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धर्म आपले फळ ताबडतोप देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो
  निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत
  विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पहाता येतो, अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. ।।१।।
  जो भूतकाळातील बुद्धां द्वारे उपदेशिला धम्म आहे जो भविष्यकाळात बुद्धा द्वारे उपदेशिला धम्म असेल, तसेच वर्तमान काळात बुद्धाद्वारे उपदेशिला धम्म आहे, त्या सर्व धम्माला मी सदैव वंदन करीतो. ।।२।।
  मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही. दुसऱ्या कोणाचा मी आधार घेणार नाही. बुद्ध धम्मच माझा एकमेव आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो. ।।३।।
  सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करुन वन्दन करतो, धम्मा संबंधी माझ्या कडून काही दोष घडला असेल तर धम्म त्या बद्दल मला क्षमा करो ।।४।।
  ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहेत, एकानेही बुद्धाच्या धम्माची बरोबरी केली नाही, ह्यामुळे माझे कल्याण होवो ।।५।।
  हा जो लोकांसाठी उपयुक्त, श्रेष्ठ अष्टांगिक मार्ग आहे, हा जो निर्वाण प्राप्तिसाठी सरळ मार्ग आहे जो सर्वश्रेष्ठ शान्तीदायक सधम्म आहे, मी त्या धम्माला वंदन करतो ।।६।।
  ३.संघ वंदना
  सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो,
  ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो, सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।
  यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला
  एस भगवतो सावकसंघो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो,
  दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥
  संघं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
  ये च संघा अतीता च, ये संघा अनागता।
  पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सब्बदा।
  नत्थि मे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं।
  एतेन सच्चवज्जेन, होतु मे जयमङगलं॥
  उत्तमङ्गेन, वन्देहं, संघ ञ्च तिविधुत्तमं।
  संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं॥
  अर्थ
  भगवन्ताचा शिष्य संघ अशा नर रत्नांचा आहे की ज्याने चार जोड्या अशा आठ सप्तपदाची प्राप्ती करुन घेतली आहे, हा संघ निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास पात्र, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे. मी जन्मभर असा संघाचे अनुकरण करीत आहे. ।।१।।
  असा जो भूतकाळातील, भविष्य काळातील व हल्लीही असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे. त्या सर्वांना मी सदैव वंदन करतो ।।२।।
  मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही. बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे, ह्या सत्वचनाने माझे जयमंगल होवो ।।३।।
  तिन्ही प्रकारानी श्रेष्ठ असलेल्या ह्या संघाला मी मस्तक वाकवून प्रणाम करतो. संघ संबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ त्याबद्दल क्षमा करो. ।।४।।
  ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही. याच्यामुळे माझे कल्याण होवो. ।।५।।
  संघ विशुद्ध, श्रेष्ठ, दक्षिणा देण्यास योग्य, शांत इन्द्रियांचा, सर्व प्रकारच्या अलिप्त, अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे. ह्या संघाला मी प्रणाम करतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s